ED Action : तपास अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना जुना फोन मागितला.        |         Lok Sabha Election : मंत्र्यांच्या मुलांना उमदेवारी देणे घराणेशाही नाही : सिद्धरामय्या        |         Lok Sabha Election : काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांचे जावई रामकृष्ण दोडामणींना कर्नाटकातून उमेदवारी.        |         Water Shortage : पाण्याचा अपव्यय केल्याने बेंगळुरूत 22 कुटुंबांना दंड.        |         Lok Sabha Election : पत्नीला उमेदवारी दिल्याने आसामच्या काँग्रेस आमदाराचा राजीनामा.        |         Lok Sabha Election : काँग्रेस महिला नेत्याने कंगना रनौटचा फोटो पोस्ट केल्यावर वादंग        |         Election Commission : माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेशकुमार, डॉ. सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त.        |         One Nation One Election : रामनाथ कोविंद यांचा अहवाल राष्ट्रपतींना सादर.        |         Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो वापरण्यास सुप्रीम कोर्टाकडून मनाई.        |         Bhandara : शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य निलंबित.        |         Lok Sabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांचे निवडणूक लढण्याचे संकेत.        |         Education Department : शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा; राज्यात आनंदाचे वातावरण        |         Nagpur : नागपूरचे टेकडी गणेश मंदिर ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित        |         Vanchit Bahujan Aghadi : संजय राऊत खोटे बोलत आहेत. प्रकाश आंबेडकर यांची टीका.        |         Nitin Deshmukh : भाषणात तरुणाचा गोंधळ, कापसाचा मुद्द्यावर आक्रमक.

न्यूज इनशॉर्ट

Traffic Police : अकोल्यातील दोन हजार चालकांना दंड

Akola News : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध अकोला पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. सुमारे 2 हजार 671 वाहन चालकांना खास मोहिम राबवित पोलिसांनी दंड केला आहे. या वाहन चालकांकडून 13 लाख 35 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. फॅन्सी नंबरप्लेट, लायसन्स नसणे, पीयूसी नसणे, वाहनाचे आरसी कार्ड नसणे, इन्शुरन्स सोबत न ठेवणे, ट्रिपल सिट, राँग साइड वाहन चालविणे, उड्डाणपुलावरून राँग साइड वाहन नेणे असे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक सुनील किनगे यांनी दिली. ही मोहित आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे किनगे म्हणाले.
Read More

Shiv Jayanti : उत्साहात झाला छत्रपतींचा जयजयकार

Akola : जुने शहर येथे 1974 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री वीर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, उपक्रम घेण्यात येतात. थोर व्यक्ती आणि क्रांतिकारकांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यात येते. मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव वीर हनुमान चौक आणि शिवपेठ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.‌ दीप प्रज्वलन करून छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन‌ करून हारार्पण करण्यात आले. आतंषबाजी करुन परिसरात मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी श्री वीर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जुने शहर भागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More

Akola : खाटुश्याम बाबायात्रेचा अकोल्यात उत्साह

Akola : बाबा खाटु श्याम यांची निशाण यात्रा डाबकी रोडमार्गे काढण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक ओळंबे यांच्यातर्फे खाटु श्याम निशाण यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी निशाण यात्रेचे पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली. शितपेयाचे वितरण करण्यात आले. श्याम पोद्दार, संजय अग्रवाल, प्रा. शिवकुमार चौबे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजू बाबा कॅटरर्सचे संचालक प्रकाश नानकदे यांनी सहकार्य केले. गुड मॉर्निं ग्रुपचे गजानन घोंगे, राजा देशमुख, संतोष गोळे, गजानन गोलाईत, किशोर वडतकर, नितीन बदरखे, राम फाटे, यश देशमुख, उमेश जनोरकर, स्वप्नील गासे, अरूण मानकर आदी यावेळी उपस्थित होते.
Read More

Unseasonal Rain : विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा

Nagpur : अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा विदर्भातील अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपल्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी पावसामुळे यवतमाळमध्ये अनेक घरांची व झाडांची पडझड झाली आहे. आर्णी, यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, पुसद, महागाव, उमरेड आदी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आर्णी तालुक्यातील एका वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनेक शाळांवरील टीनपत्र्याचे छप्पर उडून गेले आहे. नागपूरमध्येही वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून अद्यापही विदर्भातील अनेक जिल्हे सावरलेले नाहीत.
Read More

Buldhana Police : मोठ्या कारवाईत पकडला 210 किलो गांजा

Chikhli : खामगाववरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैध वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गांजा चिखली पोलिसांनी पकडला आहे. पकडलेला गांजा 210 किलो असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या सुरुवातीलाच ही कारवाई केल्यामुळे चिखली पोलिसांचे कौतुक होत आहे. खामगाव-जालना रोडवरील भानखेड जवळ अवैधपणे वाहतूक होत असलेल्या कंटेनरमध्ये लाखो रुपयांचा गांजा असल्याची गुप्त माहिती मिळताच चिखली पोलिसांनी सापळा रचून कंटेनर ताब्यात घेतले. चिखली पोलिस दल, ठाणेदार संग्राम पाटील, जिल्हा वाहतूक निरीक्षक संतोष चिडे, नीलेश शिंगणे यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास चिखली पोलिस करीत आहे.
Read More

Yavatmal : यवतमाळमध्ये पीकविमा कंपनीकडून फसवणूक

Yavatmal : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पिकविम्याची रक्कम  मिळणे अपेक्षित होते. पण पिकविमा कंपनीच्या मनमानीमुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ पिकविमा मिळावा, यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती. मनसे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचल्नीयावर त्यांनी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांशी मोबाइलद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचे सांगितले. संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांने हातातील मोबाइल अधिकाऱ्याला फेकून मारला. शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ विदर्भातील सामाजिक माध्यमावर  व्हायरल झाला आहे.
Read More

Nagpur Crime : नागपुरात तरुणावर गोळीबार

Nagpur : नागपूर शहरात शुक्रवारी दिवसाढवळ्या एका तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. तर दुसऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. कामगार नगर येथील सम्राट अशोक चौकात कारमध्ये आलेल्या 5 ते 6 गुन्हेगारांनी तेथे उभ्या असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सोनू नामक तरुणावर गोळी झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सोनू शुक्रवारी पहाटे त्याचा मित्र शेख अमजदसोबत मोमीनपुरा संकुलात गेला होता. सोनूचा अवैध व्यवसायाशी संबंध आहे. सदाफ नावाच्या व्यक्तीशी सोनुचा अवैध व्यवसायातून वाद सुरू होता. त्यातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोनुचा साथीदार शेख अमजद याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्लाही करण्यात आला. या हल्ल्यातून सोनू, अमजद बचावले.
Read More

Lok Sabha Election 2024 : शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा

New Delhi : लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या म्हणजेच शनिवार 16 मार्च रोजी होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत 2024 मधील सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाची तयारी सुरू असताना राजकीय पक्ष कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकांच्या कार्यक्रमाची उद्या घोषणा होणार आहे. निवडणुकांच्या घोषणेपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे निवडणुकीकडे लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
Read More

Nagpur : कुलूप बंद घरात तीन मृतदेह आढळले

Nagpur : जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एकाच परिवारातील पती-पत्नी आणि मुलगा असे तिघांचे मृतदेह आढळले आहेत. पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांचाही मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांचाही मृत्यू कसा झाला आणि नेमके काय घडले? याचा शोध पोलिस घेत आहेत.  तिघांचे मृतदेह आढळल्याने त्यांनी आत्महत्या केली की घातपात आहे, हे अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत.
Read More

Gadchiroli : बालिकेवरील अत्याचारानंतर डॉक्टर बडतर्फ

Gadchiroli : गडचिरोली  जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एका दुर्गम गावात अवघ्या पाच वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार झाला आहे. याप्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्यानंतर जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन मानसेवी डॅाक्टरांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. पीडित बालिकेवर उपचार करण्यासाठी या तिघांपैकी कोणीही हजर नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. बलात्कारातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याशिवाय सेवेत हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावळ साळवे यांनी जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.
Read More
Top Selling Multipurpose WP Theme

नवस्वराज - व्हिडिओ

Top Selling Multipurpose WP Theme
banner
banner
banner

आम्हाला बातम्या पाठविण्यासाठी येथे क्लिक करा 

error: Content is protected !!