Home » Yavatmal : यवतमाळमध्ये पीकविमा कंपनीकडून फसवणूक

Yavatmal : यवतमाळमध्ये पीकविमा कंपनीकडून फसवणूक

Maharashtra Navnirman Sena : मनसेतर्फे अधिकाऱ्याला मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

by नवस्वराज
0 comment

Yavatmal : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पिकविम्याची रक्कम  मिळणे अपेक्षित होते. पण पिकविमा कंपनीच्या मनमानीमुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ पिकविमा मिळावा, यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती. मनसे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचल्नीयावर त्यांनी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांशी मोबाइलद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचे सांगितले. संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांने हातातील मोबाइल अधिकाऱ्याला फेकून मारला. शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ विदर्भातील सामाजिक माध्यमावर  व्हायरल झाला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!