Home » Lok Sabha Election : ती नाची, डांसर, बबली; संजय राऊत हे काय बोलून गेले

Lok Sabha Election : ती नाची, डांसर, बबली; संजय राऊत हे काय बोलून गेले

Amaravati Constituency : निवडणूक प्रचारात आक्षेपार्ह शब्दांचा वापर

by नवस्वराज
0 comment

Shiv Sena : खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डांसर आणि बबली अशा शब्दांचा वापर केला. अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये वानखेडे यांची लढाई एका ‘नाची’सोबत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

ज्या बाईने मातोश्री मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषयी अपशब्द वापरले. हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसेनेचे पहिले आणि नैतिक कर्तव्य असल्याचे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीची लढाई देशाची लढाई आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नाची विरोधातील नाही. एका डांसर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.

अशा बाईच्या विरोधात शिवसैनिकांनी काम करायला हवे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असले पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा, असे देखील खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!