Home » Lok Sabha Election 2024 : शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा

Lok Sabha Election 2024 : शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा

Election Commission : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष

by नवस्वराज
0 comment

New Delhi : लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या म्हणजेच शनिवार 16 मार्च रोजी होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत 2024 मधील सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाची तयारी सुरू असताना राजकीय पक्ष कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकांच्या कार्यक्रमाची उद्या घोषणा होणार आहे. निवडणुकांच्या घोषणेपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे निवडणुकीकडे लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!