Home » Lok Sabha Election : गृहमतदान ठरले शेवटचे; वृद्धाचा मृत्यू

Lok Sabha Election : गृहमतदान ठरले शेवटचे; वृद्धाचा मृत्यू

Nagpur Constituency : नागपुरातील धरमपेठ भागातील घटना 

by admin
0 comment

Nagpur News : नागपूर लोकसभा मतदारसंघात एका ज्येष्ठ नागरिकाचे ‘व्होट फ्रॉम होम’ अखेरचे मतदान ठरले. तीन दिवसांपूर्वीच गृह मतदान करणाऱ्या एका वृद्धाचा गुरूवारी मृत्यू झाला. रूपलाल मोहनलाल हिरणवार (वय 88) रा. गवळीपुरा, धरमपेठ असे निधन झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते माजी नगरसेवक सुनील हिरणवार यांचे नातेवाईक आहेत.

रूपलाल यांनी 15 एप्रिल 2024 रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी गृह मतदान केले होते. त्यानंतर रुपलाल यांची प्रकृती खालवली. उपचारादरम्यान त्यांचा गुरूवारी (18 एप्रिल) मृत्यू झाला. नागपूर लोकसभा मतदारसंघात 17 एप्रिलपर्यंत सुमारे 01 हजार 257 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांकडून गृह मतदानाचा हक्क बजावण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!