Home » Akola Police : दुहेरी हत्याकांडातील मारेकरी काही तासात पकडले 

Akola Police : दुहेरी हत्याकांडातील मारेकरी काही तासात पकडले 

Crime News : रामदास पेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी

by admin
0 comment

Double Murder Case : एकाच रात्री घडलेल्या दोन हत्याकांड प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यात अकोल्यातील रामदासपेठ पोलिसांना यश आले आहे. रेल्वे स्टेशन अकोला परीसरात असलेल्या गुजराती स्वीट जवळील जैन कटलरीच्या समोर तिघांनी 18 एप्रिल रोजी अतुल लक्ष्मण थोरात  (वय 30 वर्ष रा. अशोक नगर, अकोट फैल अकोला ) यांना क्षुल्लक कारणावरुन धारधार चाकुने पोटात व मानेवर वार करुन जखमी केले होते.

उपचारादरम्यान अतुल यांचा मृत्यू झाला होता. अशातच जुन्या वादावरुन तिघांनी राज संजय गायकवाड  (वय 19 वर्ष रा. बजरंग चौक, विजय नगर अकोला) याला धारधार चाकूने पोटात व मानेवर वार करून जखमी केले. राज याचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार मनीष शरद भाकरे (वय 21 वर्ष), ऋषीकेश दीपक आपोतीकर  (वय 20 वर्ष)  (दोन्ही रा. देशमुख फैल अकोला) व आणखी एकाला (रा. माता नगर ) ताब्यात घेण्यात आले.

तिघांनी जैन कटलरीच्या समोर गुजराती स्वीट रेल्वे स्टेशन अकोला येथे अतुल लक्ष्मण थोरात यांची आणि विजय नगर येथील राज संजय गायकवाड याची हत्या केल्याचे कबूल केले. या दुहेरी हत्याकांडमध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक के. डी. पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक मीरा सोनुने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सदाशिव सुळकर, शेख हसन शेख अब्दुल्ला, किरण गवई, श्याम मोहळे, अनिल धनभर, संदीप वानखडे, पूजा यंदे यांनी ही कारवाई केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!