Home » Buldhana Police : मोठ्या कारवाईत पकडला 210 किलो गांजा

Buldhana Police : मोठ्या कारवाईत पकडला 210 किलो गांजा

by admin
0 comment

Chikhli : खामगाववरून जालनाकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैध वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गांजा चिखली पोलिसांनी पकडला आहे. पकडलेला गांजा 210 किलो असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या सुरुवातीलाच ही कारवाई केल्यामुळे चिखली पोलिसांचे कौतुक होत आहे. खामगाव-जालना रोडवरील भानखेड जवळ अवैधपणे वाहतूक होत असलेल्या कंटेनरमध्ये लाखो रुपयांचा गांजा असल्याची गुप्त माहिती मिळताच चिखली पोलिसांनी सापळा रचून कंटेनर ताब्यात घेतले. चिखली पोलिस दल, ठाणेदार संग्राम पाटील, जिल्हा वाहतूक निरीक्षक संतोष चिडे, नीलेश शिंगणे यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास चिखली पोलिस करीत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!