Home » Lok Sabha Election : संजय राऊत यांच्या टीकेला नवनीत राणा यांचे प्रत्युत्तर 

Lok Sabha Election : संजय राऊत यांच्या टीकेला नवनीत राणा यांचे प्रत्युत्तर 

Amravati Constituency : तुमच्यासारखे छप्पन गाडण्याची ताकद आहे 

by admin
0 comment

Amravati: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती येथील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. वाटेल तसं राऊत बोलत होते. त्यांनी बबली, नाची आणि डान्सर अशा शब्दांत नवनीत राणांचा उल्लेख केला होता. यावर अमरावतीत एका सभेत नवनीत राणा यांनी राऊतांनी केलेल्या या टीकेला चोख उत्तर दिले आहे. असे वक्तव्य माझ्याबद्दल करण्यापूर्वी जिला सासरी पाठवलं त्या मुलीकडे आणि स्वतःच्या आईकडे बघायला हवं होतं.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

” कोण हा संजय राऊत? अशा लोकांनी सीतेलाही भोगायला लावले होते. मी अमरावतीची सून आहे. तरीही माझा अपमान केला. जेव्हा महिला काम करतात तेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतात. एखादी महिला सार्वजनिक क्षेत्रात काम करते म्हणजे तिचा स्वाभिमान विकत नाही. ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला त्या आईचा तरी विचार राऊतांनी करायला हवा होता. लग्नानंतर ज्या मुलीची सासरी पाठवणी केली तिचा विचार करायला हवा होता. माझ्यावर टीका करण्याआगोदर स्वतःच्या पत्नीकडे बघायला हवं होतं. नवनीत राणासह अमरावतीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान यात जोडला गेला आहे. संजय राऊत यांनी माझाच नाही प्रत्येक महिलेचा अपमान केला आहे.”

रवी राणांचे उत्तर

नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी देखील संजय राऊतांना उत्तर दिले आहे. रवी राणा म्हणाले, “संजय राऊत अमरावतीत आला आणि नवनीत राणांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करून गेला. अतिशय खालच्या पातळीवर बोललेला संजय राऊत आता जनाब संजय राऊत झाला आहे. जनाब संजय राऊत, तू सून ले मेरी बात अमरावतीत येऊन तू नवनीत राणांचा अपमान केला त्यांना गाडण्याची भाषा केली. ही अमरावती आहे हे लक्षात ठेव. तुझ्यासारखे या अमरावतीत 56 आलेतरी त्यांना गाडण्याची ताकद आमच्यात आहे. नवनीत राणाविरोधात ज्या भाषेत टीका केली. नवनीत राणा तुमच्या वयाची महिला आहे आहे. 14 दिवस जेलमध्ये ठेवले तरीही तुमचे पोट भरले नाही, आणि परत तुम्ही अमरावतीला येऊन गाडण्याची भाषा बोलता. नवनीत राणा हिंदू शेरनी म्हणून आता पुढे आल्या आहेत. असेही रवी राणा म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!