Home » अकोल्यात संत गाडगे बाबा पाणपोईचे लोकार्पण

अकोल्यात संत गाडगे बाबा पाणपोईचे लोकार्पण

by नवस्वराज
0 comment

अकोला : गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोलातर्फे संत गाडगे बाबा पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. गाडगे बाबा यांच्या दशसूत्री प्रमाणे तहानलेल्यांना पाणी यासंदेशावर चालण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे स्व. जानकीराम सिह बलोदे, स्व.चंदुलाल बुंदेले, स्व. हेमंतराव खुमकर, स्व. तुकरामजी आसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अकोला शहरात पाणपोईंची सुरुवात करण्यात आली. उमरीतील विठ्ठल नगर भागात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात श्रीमती खुमकर यांच्या हस्ते पाणपोईंचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अकोला महानगर पालिकेच्या एनएलयुएमच्या समूह संघटिका निता वाकोडे, प्रिया कावरे, नितेश खुमकर, गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले, उपाध्यक्ष वैष्णवी आसेकर, सदस्य सुरभी दोडके, गणेश जाधव, सतीश अस्वार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!