Home » Crime News : बुलढाणा-मध्य प्रदेश सीमेवर कारवाई; पिस्तुलसह काडतुसे जप्त

Crime News : बुलढाणा-मध्य प्रदेश सीमेवर कारवाई; पिस्तुलसह काडतुसे जप्त

Buldhana : निवडणुकीदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई 

by admin
0 comment

Buldhana : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 4 पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस निवडणुकीच्या कार्यात व्यस्त असल्याने शस्त्र तस्करीला वेग आला आहे. हा गोरखधंदा फोफावला आहे. या प्रकरणातील परराज्यातल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

शस्त्रांची तस्करी होत असल्याची माहिती सोनाळा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून वसाडी ते हडियामल दरम्यान आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पिस्तुलचा सौदा करण्याच्या बेतात असलेल्या चोघांची झडती घेतली. 4 पिस्तुल मॅगझीन सह 17 जिवंत काडतुस, दुचाकी वाहन, मोबाईल असा 2 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याजवळून जप्त करण्यात आला.चारही आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. चौघेही मध्यप्रदेश चे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. हिरचंद गुमानदेव उचवार, भारसिंग मिसऱ्या खिराडेव ( दोघेही राहणार पाचोरी तहसिल खकणार जिल्हा बऱ्हाणपूर), संदीप डोंगरे (आमगाव बालाघाट), आकाश मुरलीधर मेश्राम (करूनासागर , बालाघाट) असे आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रकांत पाटील, सहकारी विनोद शिंबरे, विशाल गवई, मोईनुध्धीन सैय्यद, राहुल पवार, गणेश मोरखडे यांनी ही कारवाई केली. शस्त्र कायद्याच्या कलमनुसार चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!