Home » Medical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या

Medical College : सर्वोपचार रुग्णालयातील जेवणात आढळल्या अळ्या

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : रुग्णालयातील जेवणात अळ्या निघाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 29) अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात घडला. मनसेचे पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती मिळताच सर्वोपचार रुग्णालय गाठून अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासोबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश डॉ. गजभिये यांनी दिले आहेत.

उगवा येथील रहिवाशी रुग्ण उकर्डा बळीराम मेहरे हे सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक 31 मध्ये उपचारार्थ भरती आहे. शुक्रवारी (ता. 29) मध्यरात्री 12 वाजता सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवण देण्यात आले. त्यामध्ये अळ्या व किडे दिसून आलेत. त्यांनी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर खळबळ उडाली. (Worms & Insects In Food At Government Hospital of Akola)

मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी सर्वोपचार रुग्णालयात घाव घेतली व अधिष्ठातांसोबत चर्चा केली. यावेळी मनसेचे इतर पदाधिकारी, रुग्णालतयातील कर्मचारी यांची उपस्‍थिती होती. रुग्णाच्या जेवणात निघालेल्या अळ्या सर्वोपचार रुग्णालयाच्या जेवणातील नाहीत. जेवणात अळ्या कोठून आल्या याबाबतची चौकशी करण्यात येईल असे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी यावेळी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!