नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक दिल्लीतील एनसीआरमध्ये होते. आपल्या मित्राला भेटण्यासाठी आले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आपल्या ड्रायव्हरला मला रुग्णालयात घेऊन चल असे म्हणाले. पण रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
सतीश कौशिक यांच्या अत्यंत जीवलग मित्रांपैकी एक असलेले अभिनेता अनुपम खेर यांना मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच संपूर्ण चित्रपट इंडस्ट्रीमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार सतीश कौशिक यांना मृत्यूपूर्वी काही तास अगोदर घाबरल्यासारखे वाटत होते. त्यावेळी मध्यरात्रीचे 1 वाजले होते.
अनुपख खेर यांच्याशी जवळचे नाते
सतीश कौशिक व अनुपम खेर जिवलग मित्र होते. या दोघांच्या अभिनयाची सुरुवातही एकत्रच झाली होती. त्यावेळी अनुपम खेर यांचा खिसा नेहमीच रिकामा राहत होता. यामुळे त्यांनी सतीश कौशिक यांना 80 रुपये मागितले होते. पण खेर यांना वारंवार मागूनही त्यांनी ते परत केले नव्हते. त्यामुळे सतीश कौशिक हातात काठी घेऊन त्यांना मारण्यासाठी गेले होते. ते म्हणाले माझे पैसे परत कर, नाहीतर मी तुला तोडून-फोडून टाकीन. त्यानंतर अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना 80 पैकी 60 रुपये परत केले. त्यातील 20 रुपये खेर यांनी अजून परत केले नाही. सतीश कौशिक यांना आपले 20 रुपये परत मिळाले नाही. पण खेर यांच्या रुपाने त्यांना पुढील आयुष्यभर एक चांगला मित्र मिळाला.
सतीश कौशिक यांची जीवनशैली
– दररोज मॉर्निंग वॉकला जायचे सतीश कौशिक.
– आपल्या प्रकृतीची काळजी ते नियमितपणे घ्यायचे
– कौशिक अत्यंत फिटनेस फोकस्ड होते.
जीवन परिचय
13 एप्रिल 1956 रोजी महेंद्रगड, हरियाणात जन्मलेल्या सतिश यांचा चित्रपट प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मधून शिक्षण घेतलेल्या सतिश यांना कारकिर्दीत खूप संघर्ष करावा लागला. 1980 च्या सुमारास चित्रपटांतील त्यांचा संघर्ष सुरू झाला. 1987 मध्ये मिस्टर इंडिया चित्रपटातून कॅलेंडरच्या भूमिकेतून ओळख मिळाली.