Home » Lok Sabha Electoin : उद्धव ठाकरे यांचा राजकीय अस्त जवळ

Lok Sabha Electoin : उद्धव ठाकरे यांचा राजकीय अस्त जवळ

Neelam Gorhe : अडीच वर्षाच्या कारकीर्दीत काय केले जनतेला सांगावे

by admin
0 comment

Nagpur : रामटेक मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे नागपुरात आल्या होत्या. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रचंड द्वेष आहे. संतापाच्या भरात ते जाहीर सभेतून काहीही बोलत असतात. जे त्यांच्या मनात आहे तेच बोलत आहेत. मात्र जमिनीवरील लोकांचे काय मत आहे याचा विचार ते बोलताना करत नाही. निव्वळ टीका करण्यापेक्षा त्यांनी अडीच वर्षात काय केले हे जनतेला सांगावे असे गोऱ्हे म्हणाल्या. मात्र त्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही नाही. कोणाचे दिवस आले आणि कोणाचे दिवस भरलेत हे थोड्याच दिवसात समोर येईल. उद्धव ठाकरे यांचा राजकीय दृष्ट्या जनाधार संपला हे मात्र खरे आहे. 4 जून नंतर त्यांच्या हे लक्षात येईलच अशी टीका शिंदे गटाच्या ज्येष्ट नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली.

गोऱ्हे पुढे म्हणाल्या की संजय राऊत यांच्याबाबत न बोललेलेच बरे. ते प्रचंड ज्ञानी आहेत, त्यामुळे त्यांना कुठले उत्तर न देणे हेच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे असल्याची टीकाही निलम गोऱ्हे यांनी केली.विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेऊन, मदतीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी सभा घेत आहे. मनमोहन सिंगाच्या काळातील निर्णयाचे कागद त्यांनी फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून टाकणार नाही ना..? याचे उत्तर पहिले राहुल गांधी यांनी द्यावे असेही गोऱ्हे म्हणाल्या.

भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे वाईट वाटणे स्वाभाविक आहे. भावनाताईचे कार्य दुर्लक्षित राहणार नाही. त्यांना वेगळी जबाबदारी देऊ असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे तोडगा निघू शकेल. रवींद्र वायकर यांच्या उमेदवारी संदर्भात काही भाकीत करण्यासारखे काही नाही. त्यावर बोलणे म्हणजे रस्त्यावर बसलेला ज्योतिष्य जसे काहीही सांगतो त्याप्रमाणे आहे. म्हणून त्यावर मी भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री त्यावर योग्य निर्णय घेतील असेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!