Home » Lok Sabha Election : भाजपचा जाहीरनामा केवळ फेकु

Lok Sabha Election : भाजपचा जाहीरनामा केवळ फेकु

Nana Patole : गेल्या निवडणुकीतील आश्वासने अजुनही पूर्ण झाली नाहीत

by admin
0 comment

Nagpur : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेला जाहिरनामा केवळ जुमला आहे. अदानी या जाहीरनाम्यात दिसले नाही. जनतेचे लुटलेले पैसे देखील जाहीरनाम्यात दिसले नाही. हा फेकू जाहीरनामा असून जनता याला मान्यता देणार नाही. निवडणुकीत या जाहिरनाम्याचा फारसा परिणाम होणार नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, गरीब, शेतकरी, व्यापारी यांच्या दृष्टीने हा जाहिरनामा तयार करण्यात आला असला तरी त्यातील सगळी आश्वासने खोटी आहेत. गेल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने अजुनही पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे हा जाहिरनामा जुमला असल्याची टीका पटोले यांनी केली. अभिनेता सलमान खान यांच्या घरावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला आहे. त्यामुळे राज्यात गुंडाची दहशत वाढली आहे. कायदा असणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असताना गृहमंत्री मात्र निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

सांगलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार निश्चित असल्यामुळे विशाल पाटील यांनी काय निर्णय घेतला याबाबत माहिती नाही. त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली नाही असे पटोले यानी सांगितले. वर्षा गायकवाड यांना जी जागा पाहिजे होती ती मिळाली नाही ही त्यांची भूमिका आहे. आघाडीत जागा मिळाल्या नाही त्यामुळे त्यांनी हायकमांडकडे आपले मत मांडले आहे. ज्या जागा काँग्रेसला हव्या होत्या आणि त्या शिवसेना आणि शरद पवार गटाकडे गेल्या आहेत, त्यात काही बदल करण्यासाठी वर्षा गायकवाड प्रयत्न करत आहेत. मात्र त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही नाना पटोले म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!