Home » उद्धव ठाकरेंनी तमाम ओबीसींचा अपमान केला!

उद्धव ठाकरेंनी तमाम ओबीसींचा अपमान केला!

by नवस्वराज
0 comment

नागपूर : आडनावावरून वारंवार टीका करीत उद्धव ठाकरे यांनी आपला नव्हे तर ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांच्यावर नावावरून टीका केली होती. मालेगावच्या सभेत एकशे बावन कुळे आले तरी काही फरक पडत नाही असे ते म्हणाले होते. त्याला बावनकुळे यांनी मंगळवार, २८ मार्च २०२३ रोजी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.

ठाकरे यांनी केवळ आपलाच नव्हे तर तमाम ओबीसी बांधवांचा अपमान केला आहे, असा घणाघात आमदार बावनकुळे यांनी केला. ओबीसींचा अपमान भविष्यात त्यांना भोगावा लागेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे उद्धव ठाकरे नेमके काय करणार, असा सवाल आमदार बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे खोटारडे आणि ‘नौटंकी’ आहेत, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन सावरकर यांचा अपमान केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे का शांत बसले होते, हे कळायला मार्ग नाही, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!