Home » Lok Sabha Election : आंबेडकरांच्या ‘कुकर’चे ‘प्रेशर’ राहणार

Lok Sabha Election : आंबेडकरांच्या ‘कुकर’चे ‘प्रेशर’ राहणार

Akola Constituency : सिलिंडरसाठी इच्छूक होते ‘वंचित’चे प्रमुख

by नवस्वराज
0 comment

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह निवडणूक विभागाकडून देण्यात आले. सिलिंडरसाठी इच्छूक असलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या चिन्हाचा निकाल ईश्वर चिठ्ठीद्वारे लागला. आता ॲड. आंबेडकरांच्या कुकरचे ‘प्रेशर’ नेमके कुणावर हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

अकोल्यात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. सिलिंडर या चिन्हाची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) व शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आली होती. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळाले. प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्विट करीत माहिती दिली. यापूर्वी आंबेडकर यांना उगवता सूर्य, बंगला, कपबशी आदी चिन्हे मिळाली होती. यंदा त्यांना प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल.

तिहेरी लढत

प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याविरोधात सामना होणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले हवामान अभ्यासक पंजाब डक यांना रोड रोलर हे चिन्ह मिळाले आहे.

अमरावती 37 रिंगणात

अमरावती लोकसभा निवडणुकीत 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी एकूण 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा, मविआचे उमेदवार बळवंत वानखडे, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत होणार आहे.

उद्धव सेनेची अडचण

शिवसेना ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले मशाल चिन्ह हे तात्पुरत्या स्वरूपात होते. सर्वोच्च न्यायालयाने हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेले चिन्ह पुढच्या आदेशापर्यंत ठाकरे यांना दिले आहे. हे चिन्ह ठाकरे यांच्याकडून काढून घेण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असे समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!