Mumbai | मुंबई : भारतामध्ये अतिरेकी कारवाया करण्यासाठी अतिरेक्यांना घुसवून त्यांना रसद पुरवणारा पाकिस्तान तहरिक-ए -तालिबान पाकिस्तान आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ईतर अतिरेकी संघटनांच्या हल्ल्यांमुळे रडकुंडीला आला आहे. पाकिस्तान ते बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा येथील अतिरेकी हल्ल्याच्या घटनात वाढ झाली आहे. अतिरेकी पाकिस्तानी सेना आणि पोलिस तळांना लक्ष्य करून हल्ले चढवत आहेत. नुकत्याच लष्करी तळावरील हल्ल्यात 20 पेक्षा अधिक जवान मृत्यूमुखी पडल्यामुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे. (Pakistan Under Terror Due Terrorist Attack Of Teharik-E-Taliban Appeals To United Nation)
वाढत्या अतिरेकी हल्ल्यामुळे त्रस्त पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली आहे. त्याचे प्रतिनिधी इकबाल जादून (Iqubal Jadun) यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले की, पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान अत्याधुनिक हत्यारांचा वापर करत आहेत. याचा पुरवठा संघटनेला कुठून होतो, याचा शोध संयुक्त राष्ट्र मंडळाने घ्यावा अशी विनंती पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केली आहे.