Home » कोरोना रुग्ण संख्येत वाढ, घाबरण्याचे कारण नाही

कोरोना रुग्ण संख्येत वाढ, घाबरण्याचे कारण नाही

by नवस्वराज
0 comment

अकोला : मागील काही दिवसात महाराष्ट्र आणि देशभरात कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी घाबरण्याचे कारण नाही, असे मत देशातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोना आपल्यासाठी नवीन नाही. एकंदर परिस्थिती बघता देशात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे मत डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेचे साथी आणि संसर्गजन्य विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. देशातील कोरोना साथीविरुद्धच्या लढ्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. अकोला
महानगर आणि मूर्तिजापूर येथील कोरोना रूग्ण संख्या वाढीने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. लॉकडाऊन मुळे पोळलेले नागरीकांना डॉ. गंगाखेडकर यांच्या वक्तव्यामुळे दिलासा मिळाला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!