Home » अकोल्यात गदापूजनाचा कार्यक्रम पार पडला उत्साहात

अकोल्यात गदापूजनाचा कार्यक्रम पार पडला उत्साहात

by नवस्वराज
0 comment

अकोला : हिंदूंमध्ये शौर्य जागरणासाठी संपूर्ण देशात गदापूजन कार्यक्रम घेतले जात आहे. सण-उत्सवांच्या वेळी प्रतिकात्मक शस्त्रपूजन करावे, असे विचार हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

श्री हनुमान जन्मोत्सवाचे दिवशी राष्ट्रीय जनजागृती समिती, संत तसेच समविचारी संघटनांतर्फे मोहिते प्लॉट, राऊतवाडी येथील हनुमान मंदिरात गदापूजन कार्यक्रम घेण्यात आला.
हिंदूचा इतिहास हा शौर्य आणि पराक्रमाचा आहे. अहिंसेच्या मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असा भ्रामक प्रचार करण्यात आला. देशाच्या संरक्षणासाठी हिंदू राजा आणि त्यांच्या सेनेने शेकडो वर्ष लढा दिला, बलिदान दिले. युवापिढीला खऱ्या इतिहासाची माहिती व्हावी त्यांचे मनोबल वाढावे, या दृष्टिकोनातून देशभरात ८०० ठिकाणी गदापूजन करण्यात आले.

विशेष करून समर्थ रामदास स्वामींनी देशभरात स्थापन केलेल्या मारूती मंदिरात कार्यक्रम घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यात अकोला येथील काळा मारुती मंदिर देखील आहे.
पूजनाची सुरूवात शंखनादाने झाली. सामूहिक प्रार्थना, गदापूजन, हनुमानाची आरती, स्तोत्र म्हणून सामूहिक नामजप करण्यात आला. युवापिढीने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बलशाली होऊन राष्ट्र आणि धर्माचे रक्षण करावे, मारूतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे गुण आत्मसात करावेत. सशक्त, राष्ट्रभक्त आणि धर्मप्रेमी युवापिढी निर्माण व्हावी, म्हणून पालकांनी मुलांवर लहानपणापासून योग्य संस्कार करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीच्या अधिवक्ता श्रुती भट यांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!