नागपूर : समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या संत मुक्ताबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाला समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी भेट दिली. वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी येथील सोयीसुविधा, तक्रारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले.
‘संवाद’ या उपक्रमांतर्गत आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी वसतीगृहाला भेट दिली. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आयुक्तांनी मनमोकळा संवाद साधला. आयुक्तांनी वसतिगृह गृहप्रमुख व गृहपाल यांना वसतिगृहात निवास करण्याची सक्त ताकीद दिली व त्यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यास सक्त कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी यावेळी वाचनालय व कॉम्प्युटर हॉलचे उद्घाटन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर उपस्थिती होती.