Home » Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान भाजपने जिंकले

Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान भाजपने जिंकले

तेलंगणात काँग्रेसचा विजय, दक्षिण भारतातील दुसरे राज्य खात्यात

by नवस्वराज
0 comment

New Delhi | नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील तीन राज्य भाजपने जिंकली आहेत. तेलंगणाच्या माध्यमातून केवळ एकच राज्य काँग्रेसला काबिज करता आले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसच्या सर्वच कार्यालयांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. (BJP wins Assembly election 2023 of Madhya Pradesh, Chhattisgarh & Rajasthan Congress Gets Success in Telangana)

मध्य प्रदेशमध्ये 2018 मधील दीड वर्षांचा अपवाद वगळता 2003 पासून दोन दशके भाजपाची सत्ता आहे. त्यापैकी 16 वर्षे शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली आहे. त्यामुळे शिवराजसिंह पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. शिवराजसिंह यांनी आपल्या कार्यकाळात ‘लाडली बहना योजना’ राबवली. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेची मध्य प्रदेशमध्ये चांगलीच चर्चा झाली. प्रचारादरम्यान शिवराज यांच्याकडून याच योजनेचा वारंवार उल्लेख केला जात होता. याच योजनेमुळे शिवराज यांची महिलांमध्ये ‘आमचे मामा’ अशी प्रतिमा निर्माण झाली होती.

चार राज्यांच्या निकालांवरून उत्तर भारत किंवा हिंदी भाषक पट्ट्यात भाजपने आपली पकड कायम ठेवली आहे. कर्नाटकनंतर तेलंगणातील आघाडीमुळे दक्षिण भारतात काँग्रेसचे वर्चस्व वाढले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चार राज्यांचा निकाल भाजपसाठी निश्चित फायदेशीर ठरणारा आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आदी उत्तर भारतातील राज्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आहेत. या राज्यांमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम राखल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा लाभच होणार आहे.

कर्नाटकात लोकसभेच्या २८ तर तेलंगणात १७ जागा आहेत. काँग्रेस प्रभावी असलेल्या दक्षिणतील दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या ४५ जागा आहेत. भाजपचे प्रस्थ असलेल्या हिंदी भाषक पट्ट्यात किंवा उत्तर आणि पश्चिम भारतात लोकसभेच्या ३००च्या आसपास जागा आहेत. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला वातावरण अनुकूल झाले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!