Akola | अकोला : दर्शन नळकांडे आणि अथर्व तायडे हे आयपीएल क्रिकेट सामना खेळणार आहेत. अकोल्यातील खेळाडूंना संघात स्थान मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. दोघांनाही गतवर्षीच्या संघाने कायम ठेवले आहे. (Darshan Nalkande & Atharv-Tayade From Akola Will Play IPL Cricket Competition)
क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे गुजरात टायटनकडून खेळणार आहे. सलामीला खेळणारा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे किंग्स इलेवन पंजाब संघाकडून मैदानात उतरणार आहे. दुबई येथे आयपीएलचा लिलाव होणार आहे. संघातील कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी फ्रँचायझींकडून जाहीर करण्यात आली. दर्शनची आयपीएल स्पर्धेकरिता सहाव्यांदा निवड झाली आहे. मागील तीन स्पर्धांमध्ये दर्शनने किंग्स इलेवन पंजाब संघाकडून प्रतिनिधित्व केले होते. दोन स्पर्धांपासून तो गुजरात टायटन संघाकडून प्रतिनिधित्व करीत आहे.
यापूर्वी दर्शनने वयोगट 14, 16, 19, 23 स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 19 वर्षीय गटातील भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया कपसाठी मलेशिया येथे 19 वर्षीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सहा वर्षांपासून तो रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.