Home » Akola : बसमधुन रोख पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक

Akola : बसमधुन रोख पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : खासगी बसमधुन प्रवास करणाऱ्या आंगडिया सर्व्हिसच्या कर्मचाऱ्याचे 80 लाख पळविणाऱ्या टोळीतील एकाला अकोला पोलीसांनी अटक केली आहे. राजु चेलाजी प्रजापती (वय २६ वर्ष रा. आंगडीया सर्व्हिस घर क्र. १०१ गजानन टॉवर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती) हे एका व्यापाराचे पैसे घेवून ट्रॅव्हल्सने अमरावती येथून मुंबईकडे जात असता ही घटना घडली होती. (Akola Police Arrested Mamber Of Interstate Gang Theft 80 Lacs From Private Bus)

पातुरात रविवार 26 नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून बॅग लिफ्टींग गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मागोवा घेत, एका आठवड्याच्या आत टोळीतील एक आरोपीला अटक केली. त्याच्या जवळून 79 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. पातुर हद्दीतील क्वालिटी धाब्यावर बस थांबल्यानंतर प्रजापती हे बसमधून बाहेर गेले. तेवढ्यातच आरोपी ट्रॅव्हल्स बसमध्ये चढले व त्याने रोकडने भरलेली बॅग चोरून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तपास करून मध्य प्रदेशातून विनोद विश्राम चव्हाण (वय १९ वर्ष रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि.धार) याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक गोपाल जाधव, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मंद आमीर, लिलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, चालक अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी ही कारवाई केली. विनोदचा साथीदार रहेमान उर्फे पवली गफुर खान याचा शोध पोलीस घेत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!