अकोला : २३ जुलै रोजी अकोला शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदत देण्याचे घोषणा केली होती. परंतु अजुनही अकोला शहरातील नागरिकांना मदत न मिळाल्याने अकोल्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.
शिवसेना वसाहत, मारुती नगर, हरिहरपेठ मधील नदीकाठच्या भागातील नागरिकांना अद्यापही अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अकोला तहसील ऑफिस मध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेना पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा व गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे थाली बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन बोराडे, आशुतोष तिवारी, गजानन घुसे, सतीश देशमुख, दत्ता बावस्कर, रवी अवचार, देवा गावंडे, गणेश गुंदले, रवी मडावी, चेतन मारवाल, वंदना कांबळे, शिलाबाई वानखडे आदी महिला व शिवसैनिक उपस्थित होते.