अकोला : गुजराती आणि राजस्थानी यांना राज्यातून हटविल्यास मुंबईत पैसा राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान झाला, असे नमूद करीत अनेक राजकीय पक्षांनी आता आंदोलन सुरू केले आहे. सोशल माध्यमांवरही राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधातील ट्रेंड सुरू झाला आहे.
राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून अकोला शिवसेनेच्यावतीने शनिवारी (३० जुलै) आंदोलन करण्यात आले. शिवसेना पश्चिम विभागाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात गांधी चौकात कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पूर्व विभागाचे शहर संघटक तरूण बगेरे, पूर्वचे शहर प्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे युवासेनेचे शहर प्रमुख नितीन मिश्रा, संतोष अनासाने, शरद तुरकर, गजानन चव्हाण, अभिषेक खडसाळे, विजय परमार, बबलू उके, अविनाश मोरे, नितीन ताथोड, रूपेश ढोरे, सागर कुकडे, संतोष रणपिसे, देवा गावंडे, विक्की ठाकूर, अनिल परचुरे, गजानन बोराडे, मुन्ना उकर्डे, रमेश गायकवाड, मनोज बावीस्कर, प्रकाश वानखडे, विशाल कपले, संजय अग्रवाल, विजय देशमुख, पवन शाईवाले, आशू तिवारी, बालू चव्हाण, सुनिल दुर्गे, मोंटू पंजाबी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.