Home » Bhandara : आईसमोरच मुलीचा नदीच्या पाण्यात..

Bhandara : आईसमोरच मुलीचा नदीच्या पाण्यात..

Bothli Village : एकाचवेळी दोन जीव गेल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का

by नवस्वराज
0 comment

Bhandara : नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई व मुलीचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 15 मार्च रोजी लाखांदूर तालुक्यातील बोथली धर्मापुरी येथे घडली. आई सुषमा उर्फ विद्या विजय मेश्राम वय वर्ष 39 तर मुलगी दिव्या विजय मेश्राम वय वर्ष 16 अशी मृतक व्यक्तीची नावे आहेत.

गावालगत शेजारी नाला आहे. पाणी टंचाई असल्यामुळे गावातील महिला या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जातात. कपडे धूत असताना दिव्याच्या हातातून टॉवेल सुटला. टॉवेल घेण्यासाठी दिव्या पाच मीटर पुढे पाण्यात उतरली. पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे त्यातच ती बुडाली.  मुलीला वाचविण्यासाठी आईसुद्धा धावली. खोल पाणी व पाण्यावर वेल असल्याने दिव्याची आईसुद्धा बुडाली.

नाल्यावर कपडे धूत असलेल्या दोन महिलांनी या घटनेची माहिती तत्काळ गावात दिली. घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना मिळताच चमू घटनास्थळी पोहोचली. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढण्यात आलेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूरला पाठविण्यात आले आहेत. घटनेचा तपास दिघोरी पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे बोथली, धर्मापुरी गावासह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!