BJP News : भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता रंगात येऊ लागला आहे. भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीने आपले स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोमवारी (8 एप्रिल) मैदानात उतरविले
भंडारा शहरात योगी यांची जाहीसभा दसरा मैदानात झाली. आपल्या वक्तृत्व शैलीने विरोधकाला ‘चारो खाने चित’ करणारे योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या 22 मिनिटांच्या भाषणात मोदींचा ‘सिक्रेट प्लान’ सांगितला. आदित्यनाथ म्हणाले की, भविष्यात नरेंद्र मोदी यांना भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवायचे आहे. मोदींनी देशात जातीच्या राजकारणाला तिलांजली दिली आहे. सर्व वर्गाचा विकास करण्यासाठी मोदींचा ‘मास्टर प्लान’ तयार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सत्ता देण्याचे आवाहन योगींनी केले आहे.
कोणाला दिला इशारा
‘सरकारे दम पे चलती है’ आणि तो दम फक्त नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला आहे. मोदींमुळे देशाची सीमा सुरक्षित आहे. भारतात दहशतवादी घटना कमी होऊ लागल्या आहेत. पाकिस्तान सारखा देशही आतंकवादी घटनांना थारा देताना घाबरत असल्याचे योगी म्हणाले. दहशतवादाला थारा दिल्यास सरळ ‘एअर स्ट्राइक’ केल्या जाईल असा इशाराही योगी यांनी दिला.
अयोध्येत येण्याचे आमंत्रण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भंडाराकरांना अयोध्येत रामललाच्या दर्शनाला येण्याचे नियंत्रण दिलेले आहे. बांधलेले राम मंदिर बघितल्यावर आपल्याला त्रेतायुगाचे दर्शन घडत असल्याचे योगी म्हणाले. निवडणूक झाल्यावर अयोध्याला यावे असा थेट निमंत्रणच योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.