Home » जुन्या खेड्यातील (शहरातील) वीज ग्राहकांचा त्रास संपेल का?

जुन्या खेड्यातील (शहरातील) वीज ग्राहकांचा त्रास संपेल का?

by नवस्वराज
0 comment

अकोला : महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणारे आपत्कालीन अथवा नियमित भारनियमन, भारनियमन नसले तरी कंपनीचा सर्वांत जास्त रोष जुन्या शहरावर असल्याचे दिसते. दररोज जुन्या शहरातील दगडी पूल, अगरवेस, काळा मारोती , विठ्ठल मंदिर परिसरात पाच ते सहा वेळ वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे वीज ग्राहकांना किमान एक तास ते सव्वातास अघोषित भारनियमन सहन करावे लागते. हा वीज पुरवठा खंडित होण्याचे कारण समजत नाही.

शासनाच्या मोठ्या टेलिकॉम कंपनीचा कारभार ढेपाळल्यामुळे खासगी टेलीकॉम कंपनी गब्बर झाल्या. शासनाच्या कंपनीच्या कार्यालयांची परिस्थिती दयनीय आहे. महावितरण कंपनीचा कारभार असाच राहिला तर महावितरणचे भविष्य कठीण आहे. आपण जुन्या खेड्यात राहात असल्याचे जुन्या शहरातील वीज ग्राहकांना वाटते. महावितरण कंपनीने जास्त अंत न बघता या भागातील समस्या सोडवावी, अशी त्रस्त वीज ग्राहकांची मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!