Home » पावसाचा रेड, ऑरेंज, येलो अलर्ट म्हणजे काय?

पावसाचा रेड, ऑरेंज, येलो अलर्ट म्हणजे काय?

by नवस्वराज
0 comment

अकोला : हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात येतो. खरतर, हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी भारतीय मौसम विभागाकडून चार रंगाचा कोड म्हणून वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो. या रेड, ऑरेंज, आणि यलोअलर्टचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. जाणून घेऊयात सविस्तर…

रेड अलर्ट

जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.

ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. इतकंच नाहीतर ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही अवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. कारण, यावेळी अनेक समस्या येऊ शकतात.

येलो अलर्ट

हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलोअलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा होतो की, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.

ग्रीन अलर्ट

पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो. याचा अर्थ की, संबंधित शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य असेल. यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!