Home » श्री विठ्ठल मंदिरातील हरिनाम सप्ताहाचा आज समारोप

श्री विठ्ठल मंदिरातील हरिनाम सप्ताहाचा आज समारोप

by नवस्वराज
0 comment

अकोला : –  जुने शहरातील ३१९ वर्ष पुरातन असलेल्या श्री विठ्ठल मंदिर मधे १९३३ पासून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याचा आज ४ जुलै रोजी समारोप आहे. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. प्रहरकर्यांनी वीणा घेऊन अखंड विठ्ठल नामाचा गजर केला. महानगरातील अनेक महीला भजनी मंडळांनी विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण केली. दररोज रात्री ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत हभप नंदीनी कडूस्कर (नागपूर) यांचे किर्तन झाले. ३ जुलै रोजी श्री विठ्ठल मंदिर सुंदरकान्ड मंडळातर्फे सुंदरकान्डचे पठण करण्यात आले.

४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दहिहंडी व गोपलकाल्याचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यात महीला व मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी ३.२० वाजता नवदंपत्यांचे हस्ते महापूजा होईल, त्यानंतर महानगरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा निघेल, यात विविध गावातील सांप्रदायिक भजनी सहभागी होतील. शोभायात्रेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आल्याचे श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे व्यवस्थापक रमेश अलकरी यांनी नवस्वराज ला सांगीतले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!