अकोला : अकोल्यातील सरस्वती शिशुवाटिकेत १८ जुलै रोजी विद्या भारतीच्या जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर प्रांत अध्यक्ष डॉ. राम देशमुख व विठ्ठल खारोडे होते. बैठकीची सुरूवात सरस्वती वंदनाने झाली. प्रांत अध्यक्ष राम देशमुख यांनी विद्या भारती अकोला जिल्हाच्या वर्ष २०२३-२६ च्या कार्यकारिणीची घोषणा केली. विठ्ठल खारोडे जिल्हाध्यक्ष, माधवी कुलकर्णी, साधना बडगे उपाध्यक्ष, शरद वाघ जिल्हामंत्री, गिरीश कानडे सहमंत्री, डॉ. विक्रम जोशी जिल्हा संपर्कप्रमुख, अरुण परभणीकर शारिरीक/ योग शिक्षा प्रमुख, अमित मनवर खेलकुद, स्मिता जोशी नैतिक व अध्यात्मिक शिक्षण, वृषाली जोशी संस्कृत शिक्षा, गोपाल राऊत संगीत शिक्षा प्रमुख, आसावरी देशपांडे सहप्रमुख, आकांक्षा देशमुख बालीका शिक्षा प्रमुख, शुभांगी जोशी सहप्रमुख, गिरीजा कानडे शिशुवाटिका प्रमुख, अंजली अग्निहोत्री सहप्रमुख, गिरीश कानडे संस्कृती बोध परियोजना प्रमुख, मृणाल कुलकर्णी सहप्रमुख, डॉ. दिशा पंडित विद्वत परिषद प्रमुख, डॉ. मनीषा नाईक सहप्रमुख, चंद्रकांत गवळी पर्यावरण प्रमुख, निलेश बनकर प्रशिक्षण प्रमुख , अमृतेश अग्रवाल, नितीन बोळे, सागर तिवारी, लता कुर्हेकर, सुनील गायगोल, अनिता मुकवाने, श्रीदेवी साबळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, डॉ. तारा हातवळणे शिक्षण संस्था संचालक समन्वयक, डॉ. सुबोध लहाने, रेखा खंडेलवाल, पल्लवी कुलकर्णी मार्गदर्शक, योगेश मल्लेकर अकोला महानगरमंत्री यांना दायित्व प्रदान करण्यात आले.
डाॅ राम देशमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना अनेक शाळा विद्या भारतीशी संलग्नित होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शाळा आपल्याशी जोडल्या जाव्यात यासाठी संपर्क करणे आवश्यक असून, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतांना भारतीय शिक्षण पद्धती, चिंतनाचा तसेच संस्कृतीचा आवर्जून विचार व्हावा, पाच आधारभूत विषयांच्या आधारावर शाळांमध्ये कार्यक्रम घेतले जावेत, संस्कृती बोध परियोजनेवर लक्ष केंद्रित करून अधिक शाळांमध्ये परीक्षा व्हाव्यात तसेच २०२५ पर्यंत सर्व तालुके कार्यरत करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष विठ्ठल खारोडे यांनी जिल्ह्यात अधिक जोमाने कार्य करण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन समीर थोडगे प्रांत सहमंत्री यांनी केले. शैलेश जोशी प्रांत संघटनमंत्री, भाई उपाले शिशुवाटिका प्रमुख महाराष्ट्र व गोवा, सचिन जोशी प्रांत उपाध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते.