Home » संसदेच्या बजेटपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातून ११ मंत्र्यांना वगळणार

संसदेच्या बजेटपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातून ११ मंत्र्यांना वगळणार

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांचे राजीनामे घेत तिथे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रातील नेतृत्वालाही फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि बी. एल. संतोष हे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळेल याबाबत निर्णय घेणार आहेत. वयाचा निकष लावत ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून सुटी देण्यात येणार आहे. केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी वयाची ७० वर्ष पूर्ण केली आहेत.

एकूण नऊ राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापैकी तीन राज्यांची निवडणूक लवकरच होणार आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात १० मंत्र्यांचे वय ७० पेक्षा अधिक आहे. प्राप्त माहितीनुसारी ज्या मंत्र्यांचे वय जास्त आहे किंवा ज्यांची प्रकृती साथ देत नाही त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह, नारायण राणे यांच्यासह केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश, राव इंद्रजित सिंह, जनरल व्ही. के. सिंह, हरदीप सिंह पुरी, पशुपती कुमार पारस, राजकुमार रंजन सिंह, गिरीराज सिंह, श्रीपद येस्सो नायक, आर. के. सिंह यांचा समावेश आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!