Home » वाहन वापरावर आधारित विमा लवकरच येणार चलनात

वाहन वापरावर आधारित विमा लवकरच येणार चलनात

by नवस्वराज
0 comment

मुंबई : वाहनाच्या वापरावर अधारित ऑटो विमा पॉलिसींसाठी भारतीय विमा नियमनने (इर्डाई) नवीन प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार एखादा वाहन मालक जेवढे वाहन चालवेल तेवढाच विम्याचा हफ्ता त्याला भरावा लागले. सद्य:स्थिती वाहन मालकाला एकरकमी विमा काढावा लागतो. वाहन वापरले नाही तरी त्याला ईन्शुरन्सची पूर्ण रक्कम भरावी लागते. दुचाकीसाठी ही रक्कम कमी असली तरी चार चाकी वाहनांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात.

‘इर्डाई’ने दिलेल्या प्रस्तावानुसार खराब किंवा ‘रॅश ड्रायव्हिंग’ करणाऱ्यांना जास्त प्रीमियम भरावा लागेल. त्यासाठी वाहनामध्ये जीपीएस यंत्र बसविण्यात येईल. जितके वाहन चालेल तितकाच विमा वाहन मालकाला भरावा लागले. जीपीएस यंत्राच्या माध्यमातून वाहनाच्या ड्रायव्हिंग पॅटर्नवर लक्ष ठेवले जाईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक वाहनाला ड्रायव्हिंग स्कोअर दिला जाईल, त्यावरून विम्याची रक्कम ठरवली जाईल. ‘टेलिमॅटिक्स डिजिटल’ माहितीच्या आधारावर हे सर्व करण्यात येईल.

वाहनाचा अपघात झाल्यास धडकेनंतर विमा कंपनीच्या हेल्पलाइनवर आपत्कालीन संपर्कांना एक एसएमएस पाठविला जाईल. ज्यावेळी धडक झाली त्यावेळची कारची स्थिती आणि आत असलेल्या व्यक्तींची संख्या या मॅसेजच्या माध्यमातून कळेल. वाहन कमी चालविण्यात येत असल्यास त्या आधारावर कमी प्रीमियम मालकाला भरावे लागले. याशिवाय कार मालकाची रक्कम शिल्लक राहिल्यास ती ‘कॅरी फॉरवर्ड’ही होणार आहे. सध्या विमा संपल्यानंतर विम्याची संपूर्ण रक्कम निरुपयोगी ठरते व ही रक्कम वाया जाते. त्यामुळे लवकरच हा नवीन वाहन विमा बाजारात येणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!