Home » AKola ZP News : भाजपला धूळ चारत ‘वंचित’चा चोहट्टाच्या पोटनिवडणुकीत विजय

AKola ZP News : भाजपला धूळ चारत ‘वंचित’चा चोहट्टाच्या पोटनिवडणुकीत विजय

by नवस्वराज
0 comment

By-Election 2023 : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. ‘वंचित’चे उमदेवार योगेश वडाळ हे पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदचे माजी सभापती पंजाब वडाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 18) जाहीर झाला. (Vanchit Bahijan Aghadi Wins Akola ZP Chaohatta Bazar By Election)

अकोला जिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपायला जवळपास वर्षभराचा कालावधी आहे. अशात चोहट्‍टा बाजार सर्कलची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीने प्रयत्न केले होते. पोटनिवडणुकीत भाजप, प्रहार जनशक्ती पार्टी, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी उमेदवारी दिले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, भाजपचे अकोल पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी येथे सभा घेतल्या होत्या. परंतु त्यानंतरही ‘वंचित’ने बाजी मारली.

उमेदवारनिहाय मतं

योगेश वडाळ : वंचित बहुजन आघाडी : 3 हजार 781

गजानन नळे : भाजप : 2 हजार 387

जीवन खवले : प्रहार जनशक्ती पार्टी : 1 हजार 765

गोपाळ म्हैसने : शिवसेना-ठाकरे गट : 1 हजार 160

रविंद्र अरबट : कॉंग्रेस : 795

नोटा : 121

एकूण वैध मतं : 10 हजार 09

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!