Home » उर्जापर्व फाउंडेशनचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

उर्जापर्व फाउंडेशनचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

by नवस्वराज
0 comment

अकोला : महानगरातील सर्व प्रमुख रस्ते सिमेंट काॅन्क्रिटचे बनवण्यात आले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महानगरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या टावर चौक ते रतनलाल प्लाॅट, जठारपेठ, उमरी, अग्रसेन ते दुर्गा चौक या व जवळपास सर्व रस्त्यांच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. या रस्त्यांवर मोठी इस्पितळे तसेच शाळा असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे दुचाकी वाहने घसरून दररोज किरकोळ अपघात होत आहेत. पावसाळामुळे या भेगा वाढत असून एखादा मोठा अपघात घडू शकतो.

उर्जा फाउंडेशन या समाजसेवी संघटनेने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली तसेच अन्य रस्त्यांची दुरूस्ती करण्याची विनंती केली. श्री तिवारी जनसंपर्क अधिकारी  यांनी निवेदनाचा स्विकार करून शहर अभियंता म न पा यांचेशी चर्चा केली, आयुक्तांच्या आदेशान्वये संबंधितांना लवकर निर्देश देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

निवेदन देण्यासाठी जगदीश वाघ उर्जापर्व फाउंडेशन शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष, अॅड संजय तिकांडे, गजानन इचे, राहूल इंगळे, श्रीकृष्ण तायडे, सुनिल जाधव, आदेश गावंडे, गोपाल सरदार, गोपाल भटकर, दीपक गवारे, शुभम बोंडगावकर, अमोल कोल्हे, विराज भगत उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!