Akola | अकोला : सर्व सनातनींच्या आस्थेचे प्रतीक अयोध्येचे श्रीराम मंदिर असून मंदिराचे निर्माण कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ च्या शुभमुहूर्तावर मूर्तीची स्थापना होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (Umesh Lakkhan Who Sings Ayodhya Song Belongs To Akola)
अकोलेकरांसाठी विशेष गर्वाची बाब ही की, श्रीराम मंदिरच्या गर्भगृहाच्या मुख्य द्वाराला लागलेले लाकूड चंद्रपूर येथून पाठविण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर रामभक्त नतमस्तक होतील. त्याच्या प्रथम पूजनाचा मान वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वाल्मिकी समाजाला दिला. चौकट पुजनासाठी वाल्मिकी समाजाच्या निमंत्रित शिष्टमंडळात अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता गुरुजी सारवान व उमेश लख्खन यांचाही समावेश होता. सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी पूजन केले. हम अयोध्या जायेगे या गीताचे गायन उमेश लख्खन यांनी त्यावेळी केले. गीताची रचना उमेश लख्खन यांची असून गायक देखील तेच आहेत. गीत संपूर्ण भारतात रामभक्त लख्खन या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
उमेश लख्खन यांनी ‘नवस्वराज’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. वाल्मिकी समाजाला मोठा सन्मान मिळाल्या बद्दल ‘नवस्वराज’चे संचालक ऋषिकेश जकाते, पत्रकार अभिषेक कराळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सनातन संस्कृती महासंघाचे उपाध्यक्ष अमित शिरसाट, कोषाध्यक्ष नरेंद्र कराळे आणि भूषण इंदोरिया उपस्थित होते.