Home » विजय मालोकार यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

विजय मालोकार यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जेष्ठ नेते आणि शिवसेना प्रणीत ‘महाराष्ट्र एसटी कामगार सेने’चे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. यासोबतच महाराष्ट्र एसटी कामगार सेने’च्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांना पाठविला आहे.

विजय मालोकारांच्या राजीनाम्याने अकोल्यातील ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. विजय मालोकारांच्या पुढच्या राजकीय भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेत जिल्हा प्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. 1999 मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षाने डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती. यात 2004 मध्ये त्यांनी 40 हजार मते मिळत अल्प मतांनी पराभूत व्हावे लागले. 2009 मध्ये ‘जनसुराज्य पक्षा’चे उमेदवार म्हणून मालोकारांनी 30 हजार मते घेतली होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!