अमरावती : रेल्वे खात्याने अमरावती-सुरत एक्स्प्रेसला अमरावती येथुन ३ डिसेंबर २०२२ पासून आणि सुरत येथुन २ डिसेंबर २०२२ पासून दोन शयनयान श्रेणीचे डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती-सूरत एक्सप्रेसची सुधारित संरचना आता अशी असेल. एक वातानुकूलित चेअर कार, दोन शयनयान डबे, चार द्वितीय श्रेणी चेअर-कार, दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे. ट्रेन क्रमांक 20926 मधील शयनयान श्रेणीचे आरक्षण, बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू झाले आहे.