Home » अकोला आयटीआयमध्ये अल्पसंख्यांक युवतींसाठी प्रशिक्षण

अकोला आयटीआयमध्ये अल्पसंख्यांक युवतींसाठी प्रशिक्षण

by नवस्वराज
0 comment

अकोला : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पासून वय वर्ष 18 ते 40 वयोगटातील अल्पसंख्यांक युवतींकरिता महाराष्ट्र शासनाच्यावतीने कौशल्य विकास या स्वयंरोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने फॅब्रिक कटर एॅपरेल मेड ॲप्स होम फॅशनिंग, सेल्फ एम्प्लॉईड टेलर व डाटा एन्ट्री ऑपरेटर या तीन महिन्याच्या निःशुल्क व्यवसायाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी 30 युवतींना प्रवेश दिला जाईल. यामध्ये अल्पसंख्यांक मुस्लिम, शीख बौद्ध , ख्रिश्चन, पारशी बेरोजगार युवती प्रवेश घेऊ शकतात. फॅब्रिक कटर एॅपरेल मेड ॲप्स होम फर्निशिंग व्यवसायाकरिता दहावी पास, सेल्फ एम्पलॉइड टेलर व्यवसाय करता आठवी पास व डाटा एन्ट्री ऑपरेटर करिता दहावी पास युवतींना प्रवेश घेता येईल. कुठल्याही मूळ कागदपत्रांची आवश्यकता नाही. गुणपत्रिका, टीसी, आधार कार्ड व अल्पसंख्यांक असल्याचा दाखला यांची झेरॉक्स प्रत व दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत. या सुवर्णसंधीचा अल्पसंख्यांक युवतींनी स्वयंरोजगार निर्मितीकरिता लाभ घ्यावा, तसेच सविस्तर माहितीकरिता व नाव नोंदणीकरिता संस्थेच्या कार्यालयाशी ११ ते ५ या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य राम मुळे यांनी केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!