नागपूर : देवदर्शन केल्यानंतर गावाकडे परतणाऱ्या भेंडारकर कुटुंबाची भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात तीघे ठार झाले. तर आठ जण जखमी झाले. ही घटना अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामटेक ते भंडारा मार्गावरील अरोली खंडाळा गावाजवळ घडली.
परसराम लहानू भेंडारकर (70), हिमांशु राजेश भेंडारकर (8 महिने), भार्गवी चंद्रहास बोंदरे (08) ही मृतकांची नावे असून राजेश परसराम भेंडारकर (34), दुर्गा राजेश भेंडारकर (32), मेघा चंद्रहास बोंदरे (31), सीताबाई परसराम भेंडारकर (64), उन्नती राजेश भेंडारकर (05), भार्गवी चंद्रहास बोंदरे (08, सर्व रा. सोनकापाळसगाव, ता. साकोली, जि. भंडारा) अशी जखमींची नावे आहेत.
चालक राजेश भेंडारकर हा परसराम भेंडारकर, दुर्गा भेंडारकर, मेघा बोंदरे, सीताबाई भेंडारकर, लहान मुले हिमांशु भेंडारकर, उन्नती भेंडारकर, भार्गवी बोंदरे, यांना घेऊन कार क्रमांक एमएच 36/ एच 8403 ने रामटेक येथे फिरण्यासाठी व देवदर्शनाला गेला होता.
देवदर्शन केल्यानंतर गावाकडे परत येत असताना रामटेक ते भंडारा मार्गावरील अरोली खंडाळा गावाजवळ ट्रक क्रमांक एमएच 40/ सीडी 9802 हा चालकाने रस्त्यावर इंडिकेटर, त्रिकोणी चिन्ह न ठेवता उभा केला होता. तो न दिसल्याने भरधाव कार ट्रकवर जाऊन आदळली.