Home » बुलढाण्यात तीन भावांनी एकत्र जीव गमावला

बुलढाण्यात तीन भावांनी एकत्र जीव गमावला

by नवस्वराज
0 comment

बुलढाणा : दुचाकीने अज्ञात ट्रकला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात दोन सख्खे, तर एक चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर नऊ ऑगस्ट रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. बहिणीला भेटून परत येत असताना हा अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा जवळ हा अपघात घडला. उमेश विठ्ठल कंडारकर (वय वर्ष २३), प्रशांत किसन कंडारकर (वय वर्ष २३), नितीन किसन कंडारकर (वय वर्ष २६) सर्व राहणार झोडगा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा अशी प्रत्येकांची नावे आहेत.

तिघेही भाऊ आनोराबाद येथून आंबोला येथे जात असताना एम एच २८ बीएन २७३९ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात झाला. या आपघातात तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. किसन कंडारकर यांना दोन मुलं आहेत. दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. मृत तिघेही अविवाहित होते. अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, अश्विन फेरण, कृष्णा वासोकार, आनंद वावगे, अजय गवई, राजू बगाडे घटनास्थळी हजर झाले. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या घरी नेण्यात आले. मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर कुटुंबीयातील तीन चुलत भावंडे बहिणीच्या भेटीसाठी गेले होते. ९ ऑगस्ट रोजी रात्र तिघेही स्वगृही परतीच्या वाटेवर निघाले होते. मलकापूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपुलानजीक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघातात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघाही भावांची बहिणीसोबतची ही शेवटची भेट ठरली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!