Home » Medical College : वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

Medical College : वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

by नवस्वराज
0 comment

Yavatmal | यवतमाळ : एमबीबीएस प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थीनीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली. सुहानी सहदेव ढोले (वय २०, रा. श्रीकृष्ण नगर, पाटोदा, धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

सुहानी एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय परिसरामधील वसतिगृहात राहत होती. सुहानीचा कॉल न आल्याने तिच्या आईने गुरुवारी रात्री तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या एका मैत्रीणीच्या मोबाईलवर संपर्क साधला. मैत्रीणीने सुहानीच्या खोली बाहेरून आवाज देऊन बघितला. आतून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून आत बघितले असता सुहानीचा मृतदेह ओढणाीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!