Home » केवळ दोन खांबांवर उभा असलेला सर्वात लहान देश 

केवळ दोन खांबांवर उभा असलेला सर्वात लहान देश 

by नवस्वराज
0 comment

मुंबई : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन आहे. त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. प्रचंड वेगाने वाढत असलेली लोकसंख्या या दोन्ही देशांसाठी चिंतेचा विषय आहे. एकिकडे अब्जावधी लोकसंख्या असलेले हे दोन देश असतांना काही देशांनी मात्र लोकसंख्येवर नियंत्रण मिळवले आहे.

आतापर्यंत सर्वांत कमी लोकसंख्या असलेला देश म्हणून ‘व्हॅटिकन सिटी’ ओळखला जायचा ज्याची लोकसंख्या आठशेच्या जवळपास होती. परंतु आता व्हॅटिकन सिटीला लोकसंख्येबाबत मागे टाकणारा ‘सिलॅन्ड’ हा स्वयंघोषित देश आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळी ब्रिटिशांनी समुद्रात आपल्या सैन्यासाठी एक तात्पुरता तळ उभारला होता. त्यानंतर काही काळ या तळावर कोणाचेही वास्तव नव्हते, पण आता या तळावर राहणाऱ्या लोकांनी या तळाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. सिलॅन्ड हा देश समुद्रात केवळ दोन खांबांवर उभा असून याची लोकसंख्या केवळ २७ आहे. या स्वयंघोषित देशाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता नाही, हे विशेष आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!