Home » Yavatmal Crime : अंत्ययात्रा रोखत ताब्यात घेतला विवाहितेचा मृतदेह

Yavatmal Crime : अंत्ययात्रा रोखत ताब्यात घेतला विवाहितेचा मृतदेह

Police Action : यवतमाळच्या जामकर नगरातील घटना

by नवस्वराज
0 comment

Crime News : यवतमाळ येथील जामनकर नगरातील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 15) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. पतीसह नातेवाईकांनी कुठलीही वैद्यकीय तपासणी न करताच परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना डायल 112 वरून तक्रार प्राप्त होताच अंत्ययात्रा थांबवत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला असून या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

दिपाली उर्फ नंदिनी मिश्रा (वय 26, रा. जामनकर नगर, यवतमाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. मृतक महिला पती व दोन लहान मुलांसह जामकर नगरात वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास महिलेचा झोपेतच अकस्मिक मृत्यू झाल्याची घटना पुढे आली. ही बाब पतीने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांना सांगितली. दिपालीच्या अचानक मृत्यूने परिसरातील सर्वच नागरिक अवाक झाले. अशा स्थितीत पतीसह कुटुंबीयांनी दिपालीच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. दिपालीचा मृत्यू संशयास्पद असल्याने दुपारच्या सुमारास अवधूतवाडी पोलिसांना डायल 112 वरून तक्रार देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी आताच जॉइन करा ग्रुप

रस्त्यातून परत फिरली अंत्ययात्रा

दिपालीचा मृतदेह घरातून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत असतानाच अवधूतवाडी पोलिसांचे पथक त्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी बाजोरिया नगरमध्ये अंत्ययात्रा थांबवून ती घराकडे परत घेतली. त्यानंतर मृत महिलेच्या घराजवळ पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दिपालीचा मृत्यू संशयास्पद असल्याची परिसरात चर्चा आहे. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे गूढ उकलणार आहे. अधिक तपास अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

डोळे, गळ्यावर खुणा

दिपाली व तिच्या पतीमध्ये बुधवारी रात्री चांगलाच वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पतीची कसून चौकशी सुरू केली आहे. त्याने पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचे तर चिमुकल्या मुलांनी आई चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. महिलेच्या मानेला व दोन्ही डोळ्याच्या खाली खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!