नागपूर : लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याने जयेश पुजारीला भडकवले होते. अफसर पाशा बेळगाव तुरुंगात असून तुरुंगात पाशाचे जयेश पुजारीसोबत संबंध आले. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल करीत खंडणीची मागणी करण्यासाठी जयेश पुजारी ऊर्फ कांताला प्रवृत्त करणारा लष्कर-ए-तोयबा आणि पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडियाचा माजी सचिव असलेला अफसर पाशा ऊर्फ बशीरुद्दीन नूर मोहम्मद (वय ४२, रा.चिकम्मा बलापूरा, कर्नाटक) याला लवकरच नागपुरात आणले जाणार आहे.
नागपुरात आणण्यासाठी धंतोली पथक बेळगावला रवाना झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयेशने केलेल्या खुलाशाची तपासणी केल्यावर धंतोली पोलिसांनी त्याच्यावर ‘युएपीए’ ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. जयेश गेल्या दहा वर्षांपासून बेळगाव येथील कारागृहात आहे. या कारागृहात त्याची सर्वप्रथम ‘डी’ गॅंगशी संबंधित असलेल्या माढरू युसुफ, गणेश शेट्टी आणि राशीद मलबारी याचेशी ओळख झाली.
जयेश कारागृहात असलेल्या पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडियाचा सचिव असलेला अफसर पाशाच्या संपर्कात आला. त्याने जयेशचा ‘ब्रेन वॉश’ करीत त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यानुसार धंतोली पोलिसांनी बंगरुळूमधील बेळगाव येथील कारागृहात जाऊन त्याची साक्ष नोंदविली होती.