अकोला : जुन्या शहरातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरातील, श्री विठ्ठल रूखमायी मुर्तीच्या स्थापनेला ३१९ वर्ष पुर्ण झाले, तसेच आरतीला २५ वर्ष झाल्याचे अवचित्य साधून १३ जुलै रोजी वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अॅड श्रीनिवास व राजश्री खोत दंपत्याचे हस्ते महाभिषेक करण्यात आला. सौ नाहे आणि चमूतर्फे समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज पोथीचे पारायण करण्यात आले. त्यानंतर उषाताई पुराडूपाध्ये यांचे विठ्ठल मंदीर महीला भजनी मंडळ तसेच मंदाताई खानझोडे यांच्या जागृती महीला भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम कार्यक्रम सादर केला. विठ्ठल परिवार प्रमुख संतोष पिसे आणि सहकार्यां तर्फे श्री विठ्ठल नाम जप करण्यात आला. मेधाताई खानझोडे, श्री विठ्ठल मंदिर महीला हरीपाठ मंडळ यांचा हरीपाठ तसेच संपूर्ण दिवस एकक्याचा कार्यक्रम झाला. रात्री ८.३० वाजता महाआरती व ९.०० ला प्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
उत्सव परंपरेनुसार आणि धार्मिक वातावरणात संपन्न करण्यासाठी मंडळाचे सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांचे मार्गदर्शनात व व्यवस्थापक रमेश अलकरी यांचे नेतृत्व व नियोजनात प्रवीण वाणी, नितीन खोत, यशोधन गोडबोले, आनंद उगले, सचिन मुदिराज, बबलू ठाकूर, शाम घाटे, महेश कडूस्कर, नरेंद्र कराळे, संजय गुर्जर, नितीन विसपुते, उदय गंगाखेडकर, प्रतीक अलकरी, प्रशांत गावंडे, दिनेश बंकुवाले, कुणाल ठाकूर, अभिषेक चाळसे, संग्राम खानझोडे, कैवल्य अलकरी, शरद उमाळे, प्रसाद कुटासकर, किसन बंकुवाले, राहुल जुनगडे, पियूष वाघ, ऋषी सरनाईक, आशू सरनाईक यश अलकरी, अजिंक्य अलकरी, रोहित खोत, प्रसाद जोगळेकर,; सार्थक चाळसे, अभय निंबाळकर, देवा खिलोसिया, हर्ष शर्मा, ओम ठाकूर, पियूष गुरुखुदे, उत्कर्ष शर्मा, ओम भडके, कल्पेश ठाकूर, यश ठाकूर, हर्ष सांचेला, कृष्णा सांचेला, तिलक श्रीवास, रोहन पंडित, पियूष सुदालकर, देवाशीष बर्डे, धीरज रोकडे, अथर्व अलकरी, कलश भगत, महिला कार्यक्रम प्रमुख मंजुषा अलकरी, सुनीता कुलकर्णी, मेधा खानझोडे, पूनम चाळसे, उज्ज्वला अलकरी, अनघा परचुरे, छाया परचुरे, समृद्धी खानझोडे, संजीवनी अलकरी, सीमा ठाकूर, प्रणिता परचुरे, सुधा कडूस्कर, मीनाक्षी घाटे पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.पौरोहित्याचे कार्य आशिष बलाखे, दत्ता जोशी, गोविंद परचुरे यांनी केले.