Home » अकोला लोकसभेसाठी ठाकरेंनी घेतला कानोसा

अकोला लोकसभेसाठी ठाकरेंनी घेतला कानोसा

by नवस्वराज
0 comment

अकोला : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेत अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत युती केल्यास किती फायद्याची राहील, याबाबत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून कानोसा घेतला.

उद्धव ठाकरे स्वत: राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना महत्वाच्या सूचना देखील ते देत आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करत असून आता ठाकरेंनी देखील लोकसभेसाठी रणनीती आखण्यात सुरवात केली आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची ताकद किती महत्त्वाची आहे, याबाबतही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती राहिल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडी मागण्याची शक्यता आहे. यासंदर्भाने देखील ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!