अकोला : रेशन कार्डाबाबत निर्माण झालेल्या समस्यांचे जिल्हा प्रशासनाकडुन निराकरण होत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार, १४ फेब्रुवारी २०२३ रोजी धडक दिली.
अकोला पश्चिमचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, उपशहर प्रमुख प्रकाश वानखडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला शहरातील निर्माण होणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यात आली. रेशन कार्डाच्या समस्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी पुरवठा निरीक्षकांशी चर्चा करण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात अकोला निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, शहर प्रमुख राहुल कराळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, माजी नगरसेविका मंजुषा शेळके, सुरेंद्र विसपुते, अविनाश मोरे, योगेश गिते, बाळु ढोले, सागर भारुका, नंदू ढाकरे, सूर्यकांत भरकर, लक्ष्मण पंजाबी, सुनिल दुर्गिया, प्रमोद धर्माळे, रोशन राज, गोपाल बिल्लेवार, मंगेश खंडेझोड, गणेश पोलाखळे, संजय अण्णा उलेल्लू, रुपेश ढोरे, अमित भिरळ, विक्की ठाकूर, राजेश कानपुरे, सतीश नागदिवे, योगेश गवळी, सिद्धार्थ वानखडे, जितेश कांबळे, शंभू खवळे, संजय रील, मनोज तायडे, श्याम मोहिते, अजय सुतार, रोशन शेंडे, सचिन दामले दुर्गा वानखडे, कोमल दामले, तिळगुणा इंगळे, शारदा वानखडे, कांचन खवळे, शीतल इंगळे, ज्योती इंगळे, स्वाती थुल, खुशबू कनोरा, रिजवाना परवीन, रीना कांबळे, मनीषा भारती, गुलसर खान, मंगला निखार, दीपमाळा चौहान, सुमेया परवीन, नसरीन बानो, शफिका बी, मेहरून बी, शेख सलीम, शितल मोहिते, उजमा तहानियत, सारिका आंबोरे, रेखा वाघमारे, मंगला इंगळे आदी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते.