अकोला : जुने शहरातील जयहिंद चौक परिसरात असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या जागृत मानल्या जाणाऱ्या श्री अंबीका देवी संस्थानाचा जीर्णोद्धार केल्या जाणार आहे.
१६१९ मध्ये काळ्या दगडांपासून बांधण्यात आलेले हे पुरातन शिवकालीन मंदिर आहे. अंबिका देवीसह महादेवाची पींडदेखील मंदिरात आहे. संस्थानतर्फे दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात. संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. अध्यक्षपदी नाना वानखेडे , उपाध्यक्षपदी राजेंद्र नेरकर, प्रविण अग्रवाल, सचिवपदी योगेश शांडिल्य, सहसचिवपदी गजानन रोकडे, कोषाध्यक्षपदी श्रीपाद पाथरकर, सहकोषाध्यक्षपदी शशिकांत सापधारे यांचा यात समावेश आहे.
नव्या कार्यकारिणीने मंदिराच्या जिर्णोद्धाराचा संकल्प केला. मंदिराच्या मार्गावर प्रवेशद्वार बांधण्याच्या दृष्टिकोनातून बांधकाम कंत्राटदार मिर्झा शौकत बेग यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी स्वेच्छेने सुंदर प्रवेशद्वार बांधून दिले. संस्थानतर्फे विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राजेंद्र नेरकर यांनी ‘नवस्वराज्य’ला दिली.