अकोला : कौलखेड येथील आरोग्य नगर येथील वंडर किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांकरिता शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत वाहतूक नियमांबाबत प्राथमिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रममध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक प्राथमिक शिक्षण व नियमाबाबत अवगत करून देण्यात आले.
रस्त्यावर कसे चालावे, रस्ता कसा ओलांडावा ट्राफिक सिग्नल कसे असतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेले दीपाली नारनवरे, अश्विनी माने यांनी प्रशिक्षणाकरिता उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व नियंत्रण याबाबत प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण शिबिराकरिता एनसीसी चे एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.